शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अजित पवार जो निर्णय घेतील तो कोकाटे, नितीन पवार, सरोज आहेर यांना मान्य; राजकारण ढवळले

By suyog.joshi | Updated: April 18, 2023 13:49 IST

झिरवाळ जपान दौऱ्यावर, भुजबळ आजारी असल्याने संपर्क नाही

नाशिक : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. अजित पवार यांनी २०१९ ला देखील पहाटे- पहाटे भाजपा सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेऊन अख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का दिला होता. त्यानंतर पुन्हा आता ते भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरत असून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण सात आमदार आहेत. त्याबाबत नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट शब्दात मांडल्या आहेत.

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे व कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवार जो निर्णय घेतील, त्यासोबत राहू असे सांगितले तर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य राहिल असे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे हेविवेट नेते माजी मंत्री व येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ आजारी असून त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही, ते मुंबईत आहेत.  तर विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ हे जपान दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

पक्ष वाढविण्यासाठी कोणीही प्रयत्न करते. महाराष्ट्रात ज्यांची ताकद आहे त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल. भाजपही असे करीत असेल तर त्यात काही वावगे नाही. तथापि, भाजप प्रवेशाबाबत अजित पवार यांच्यासोबत काहीही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य वाटत नाही. दादांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या हवेतील आहेत. प्रत्यक्ष घटना घडेल तेव्हा निर्णय घेऊ. त्यामुळे अजितदादा भाजपत जाणार का? यावर भाष्य करणे योग्य नाही. आपण अजित पवार यांच्या साेबत आहोत, ते जे निर्णय घेतील त्यांच्या भूमिकेशी सहमत राहू. - माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नरराज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार जी भूमिका घेतील, त्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू, आम्ही त्यांच्यासोबत राहू. अजून आमच्याशी अजित पवार, आमचे नेते शरद पवार यांनी कोणीही संपर्क साधलेला नाही. अजित पवार हे महत्त्वाचे नेते आहेत. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे असते. ते भाजपात जाणार नाही, परंतु असा काही निर्णय झालाच तर आम्ही दादांसाेबत राहू. मला मागील टर्ममध्ये उमेदवारी देतांना दादांची महत्त्वाची भूमिका होती. दादा उपमुख्यमंत्री असतांना माझ्या मतदारसंघात सुमारे ३०० कोटींची विकासकामे झाली होती. दादांबरोबर आम्ही आहोत. -नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा

सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मला प्रसारमाध्यमांकडून याबाबत कळाले. राज्यात सध्या अजित पवार हे भाजपा बरोबर जातील अशी चर्चा आहे मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृतपणे माहिती ही आमच्यापर्यंत आलेली नाही. त्या संदर्भात मी बोलणे उचित नाही आणि जेव्हा असे होईल तेव्हा पक्ष नेते जो निर्णय घेईल त्यासोबत असणार आहे. सध्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू असल्याने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालू आहे आणि रात्री घरी आल्यावर उशिरा टीव्ही बघितल्यावर ऐकायला मिळाले. त्यात अजित पवार यांनी सांगितले की, मी कोणालाही बोलवले नाही, फोन केलेला नाही. या संदर्भात पक्षाचा निरोपही नाही. -दिलीप बनकर, आमदार, निफाडअजित पवार जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. - सरोज आहेर, देवळाली मतदार संघ

हे आहेत नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रावादीचे आमदार

१) छगन भुजबळ : येवला२) नरहरी झिरवाळ : दिंडोरी४) नितीन पवार : कळवण५) माणिकराव कोकाटे : सिन्नर६) दिलीप बनकर : निफाड७) सरोज आहेर : देवळाली

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस