शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने थेट ऊसातूनच घेतली मजुराच्या अंगावर झेप; सुदैवाने बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:58 IST

शनिवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गावात बाजार आणण्यासाठी मोटारसायकलवर निघाले होते, तेव्हा ही घटना घडली.  

दत्ता दिघोळे - 

नाशिक - सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी ( दि.२८ ) रात्री घडली. जखमी अवस्थेत पाठलाग करणाऱ्या बिबट्याच्या तावडीतून मजूर बालंबाल बचावल्याने कुटूंबाने सुटकेचा निश्वास सोडला. येथिल दिगंबर कातकाडे वस्तीजवळ राहणारे विष्णू बाळासाहेब तुपे (२५) (बेलु ता.सिन्नर ) हे शनिवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास गावात बाजार आणण्यासाठी मोटारसायकलवर निघाले होते, तेव्हा ही घटना घडली.  

गंगाघाटाच्या रस्त्यावरून जात असतांना तुपे यांना समोरच्या ऊसात मांजराच्या डोळ्यांसारखे चमकल्याने तुपे यांना शंका आल्याने ते थांबले तेवढ्यात समोरच्या दिशेने बिबट्याने त्यांच्या अंगावर झाप मारून हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तुपे जमिनीवर पडले.त्यांच्या हाताला,पायाला व मानेवर दातांनी जखमा झाल्या आहे.येवढ्यात उभी असलेली मोटारसायकल जमिनीवर पडल्याने तुपे बिबट्याच्या तावडीतून सुटले.  या झटापटीत बिबट्या थोडा अंतरावर असल्याचे पाहून जखमी विष्णू तुपे याने आपल्या घराकडे पळ काढला.बिबट्याने पुन्हा पाठलाग सुरू केला मात्र थोड्याच अंतरावर घर असल्याने उजेडात गेलेल्या तुपेचा पाठलाग सोडून बिबट्याने पुन्हा शेजारच्या उसात पलायन केले.जखमी अवस्थेत तुपे यांनी बिबट्याच्या हल्ल्याला धिराने परतून लावले तसेच घाबरलेल्या अवस्थेतही त्यांनी घराकडे पळ काढल्यामुळे ते बालंबाल बचावले.हा संपूर्ण प्रकार कुटूंबातील सदस्यांना समजताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान घडलेला प्रकार शेजारच्या राम दिगंबर कातकाडे यांना समजल्यावर त्यांनी घडलेला प्रकार वनविभागाला कळवत तुपे यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.येथिल प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिक येथिल सिव्हिल मध्ये दाखल केले आहे.  

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याLabourकामगारforestजंगल