विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 01:17 IST2022-03-09T01:17:16+5:302022-03-09T01:17:33+5:30

येवला तालुक्यातील आडगाव चोथवा शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढले.

The leopard that fell into the well was taken out by the forest department | विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर

ठळक मुद्देआडगाव चोथवा येथील घटना

येवला : तालुक्यातील आडगाव चोथवा शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढले.

आडगाव चोथवा येथील उत्तम खोकले यांच्या शेतातील ६० फूट खोल असणाऱ्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे सकाळी आढळून आले. या बाबत वन विभागाला माहिती दिली गेली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद करत विहिरीच्या बाहेर काढले. तपासणी करून या बिबट्याला निफाड वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: The leopard that fell into the well was taken out by the forest department