कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले
By नामदेव भोर | Updated: June 9, 2023 16:24 IST2023-06-09T16:24:46+5:302023-06-09T16:24:55+5:30
डिलीव्हरी बॉयने परस्पर लांबविल्याची घटना समोर आली आहे.

कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले
नाशिक : गंगापूररोड भागातील थत्तेनगर येथील एका दुकानदाराने कंपनीकडून मागवलेले आयफोन इंस्टा कार्ड सर्व्हिसेस कंपनीमधून डिलिवरीसाठी दिलेले ३ लाख ९१ हजार १३३ रुपयांचे आयफोन संशयित डिलीव्हरी बॉयने परस्पर लांबविल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश ज्ञानेरश्वर पाटील (वय २९, रा. बोधलेनगर, टागोरनगर, साईराज गार्डन, नाशिक) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांनी त्यांच्या थत्तेनगर येथील प्रथमेश अपार्टमेंट येथील दुकानात विक्रीसाठी कंपनीकडून मागवलेले आयफोन इंस्टा कार्ड सर्व्हिसेस कंपनीमधून डिलिवरीसाठी संशयित बळीराम रावजी खोकले (रा. धामनगाव , ता. इगतपुरी) यांना दिले होते.
ते त्यांनी पार्सलमधून परस्पर काढून घेत अपहार केल्याची तक्रार पाटील यांनी केली. त्यामुळे पोलिसांनी संशयित खोकलेविरोधात विश्वासघात करून अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.