शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पिंपळगावची ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 23:06 IST

पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतला बहुमान मिळाला आहे. त्यात पाच लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते देण्यात आले.

ठळक मुद्देराज्यातील पहिलीच ग्रामपंचायत : गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा

पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतला बहुमान मिळाला आहे. त्यात पाच लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते देण्यात आले.पिंपळगावी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डेदेखील आहेत. वनराई बंधारे, विविध दाखल्यांसाठी ऑनलाइन सेवा-सुविधा, यासह शाळा डिजिटलदेखील झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने संपूर्ण गावात लक्ष ठेवले जाते. पंचायतीची पाणपट्टी आणि घरपट्टीची वसुलीही शंभर टक्के आहे. सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छतागृह आणि शंभर टक्के शौचालयांचा वापर केला जातो. गाव स्मार्ट करण्यासाठी सरपंच अलका बनकर, उपसरपंच नीलेश बापू कडाळे, ग्रामसेवक लिंगराज जंगम, ग्रामपंचातीचे सदस्य गणेश बनकर तसेच ग्रामस्थ यांचे योगदान आहे. माझी वसुंधरा अभियनांतर्गत ग्रामपंचायतीला यापूर्वी तब्ब्ल दीड कोटींचे पारितोषिक मिळाले होते. याशिवाय स्मार्ट ग्राम या योजनेत सहभागी होऊन पुन्हा राज्यात एक नंबरचा क्रमांक मिळवला होता. आता ग्रामपंचायतीला आएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.सदर प्रमाणपत्राचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चाटे, प्रकल्प संचालक, उज्ज्वला बावके, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहायक गटविकास अधिकारी रविकांत सानप, विस्तार अधिकारी शिंदे, सोनवणे, आदी उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांचा सत्कारपिंपळगाव ग्रामपालिकेने राज्यात प्रथम आयएसओ मानांकित होण्याचा बहुमान पटकविल्याने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते उपसरपंच बापू कडाळे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, सुहास मोरे, सुरेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक विधाते, राहुल बनकर, आश्विन घागरे, रामकृष्ण खोडे, बाळा बनकर, गोरख देवकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक