नाशिक : इगतपुरी येथील दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इगतपुरी सर्कीट हाऊस येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण भमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्कीट हाऊस येथे कोश्यारी यांनी काही वेळ या तीनही प्रमुखांशी संवाद साधला. त्यांनी जिल्ह्यातील माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.
राज्यपालांनी साधला गमे, मांढरे, बनसोड यांच्याशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 01:16 IST