सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला
By संजय पाठक | Updated: November 14, 2023 16:11 IST2023-11-14T16:10:38+5:302023-11-14T16:11:05+5:30
नाशिक येथे दादा भुसे यांच्या पुढाकाराने पंडित प्रदीपजी शर्मा यांचे महाशिवपुराण कथा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला
नाशिक- राज्य सरकार एक दिलाने काम करत आहे त्याचबरोबर लोकहिताचे चांगले निर्णय घेत आहे. विकासात्मक निर्णय होत आहे त्यामुळेच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पोटात दुखतय आणि ते दिशाभूल करणारे वक्तव्य करताय असं मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.
नाशिक येथे दादा भुसे यांच्या पुढाकाराने पंडित प्रदीपजी शर्मा यांचे महाशिवपुराण कथा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. नाशिक शहरात पाथर्डी येथे कथा यज्ञ स्थळाचे भूमिपूजन आज दादा भुसे आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे उपस्थित करण्यात आले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
संजय राऊत हे माध्यमांसमोर विविध प्रकारची वक्तव्य करत आहेत त्यामागे त्यांचे नैराश्य आहे कारण सरकार चांगलं काम करत आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते २४ तासात सरकार पडेल कधी ७२ तासात सरकार पडेल अशा सातत्याने भाकिते करताना दिसतात. मात्र, आता माध्यमांनीच त्यांना या संदर्भात जाब विचारला पाहिजे असेही दादा भुसे म्हणाले.