नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल

By संदीप भालेराव | Published: August 12, 2023 06:42 PM2023-08-12T18:42:50+5:302023-08-12T18:43:06+5:30

चाचणीनंतर पहाटे ५:३० वाजता बस झाली रवाना

The first 'Shivai' ran from Nashik to Pune, eight buses arrived | नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल

नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल

googlenewsNext

संदीप भालेराव, नाशिक: बहुप्रतीक्षित इलेक्ट्रॉनिक्स शिवाई बसेस नाशिकला दाखल झाल्यानंतर शनिवारी (दि. १२) पहाटे ५:३० वाजता पहिली बस पुण्याच्या दिशेने धावली. नाशिक-पुणेसाठी विभागाला एकूण आठ बसेस मिळाल्या असून, या सर्व बसेस पुण्यासाठी सुरू झाल्या आहेत. पहिल्या बसने एकूण ३५ प्रवाशांनी प्रवास केला आणि निर्धारित वेळेत पुण्यातील शिवाजीनगरला पोहोचली. राज्यातील अनेक मार्गांवर ई-शिवशाही बसेस सुरू झाल्यानंतर नाशिकला देखील या बसेसची प्रतीक्षा होती. दोन दिवसांपूर्वी नाशिकला टप्प्याटप्प्याने आठ बसेस मिळाल्या असून, या सर्व बसेस नाशिक-पुणे मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी पहाटे पुण्यासाठी पहिली ई-शिवाई बस सोडण्यात आली. पहिल्याच बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आणि ३५ प्रवाशांनी या बसमधून पुण्याकडे प्रस्थान केले.

ठक्कर बाजार बसस्थानक येथून बसेसला सुरुवात झाली असून, ज्येष्ठ प्रवाशाच्या हस्ते ई-शिवाईचे पूजन करून बस मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर दर अर्ध्या तासाने या बसेस पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांमध्ये उत्साह दिसून आला. नाशिक-१ आगार येथे या बसेसच्या चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली असून, शुक्रवारी यशस्वी चाचणीनंतर या बसेस मार्गावर सोडण्यात आल्या.

Web Title: The first 'Shivai' ran from Nashik to Pune, eight buses arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.