शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

उमेदवारी वडिलांना, अर्ज भरला मुलाने; आपल्याच जागेबद्दल काँग्रेस गाफील, भाजपाकडून पाठिंब्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:07 IST

नाशकात सुधीर तांबे यांना होती काँग्रेसची अधिकृत उमेदवारी; ऐनवेळी मुलगा सत्यजित यांची अपक्ष एन्ट्री

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जबरदस्त ‘उमेदवारी नाट्याने’ चर्चेत आली आहे. नामांकन भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र तथा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपने  अधिकृत उमेदवार न देता सत्यजित यांना पाठिंबा जाहीर करण्याची भूमिका घेतल्याने नव्या समीकरणाला उधाण आले आहे. 

भाजपने दोन कार्यकर्त्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रत्यक्षात दोघांनाही एबी फॉर्म दिला नाही. परिणामी, पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीत राजकीय पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार नसून, अपक्षांमध्येच लढत होणार आहे. अखेरच्या दिवसापर्यंत २९ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात येणार आहे. 

असे घडले नाट्य...

सुधीर तांबे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सकाळीच जाहीर केले. भाजपने उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दुपारी बारानंतर घोषणा करू, असे सांगितल्याने उत्सुकता ताणली गेली. भाजपने धनंजय जाधव व धनराज विसपुते या दोघांना अर्जाची तयारी करण्यास सांगितले. 

दुपारी दीडला सत्यजित तांबे हे पत्नीसह आले व अर्ज भरण्याची तयारी सुरू केली. भाजपकडून सत्यजित यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पसरल्याने भाजप उमेदवारांचीही अस्वस्थता वाढली. पावणेतीनच्या सुमारास सत्यजित यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज भरले, तर  भाजपच्या वतीने जाधव व विसपुते या दोघांनी भाजप व अपक्ष असे अर्ज दाखल केले. मात्र, तिघांनीही एबी फॉर्म जोडला नसल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

इतरत्र चित्र काय?

अमरावती पदवीधर मतदारसंघ ३४ उमेदवारांकडून ४४ नामांकन अर्ज दाखल. ऐनवेळी काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला देण्यात आली. धीरज लिंगाडे हे मविआचे उमेदवार असल्याचे काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सांगितले.

नागपूर शिक्षक मतदारसंघ भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. भाजपने ऐनवेळी गाणार यांना समर्थन दिले. काँग्रेसने अजून कुणालाही पाठिंबा न दिल्याने लढतीचे चित्र अस्पष्ट आहे.  

कोकण शिक्षक मतदारसंघ शेकापचे बाळाराम पाटील यांनाच पुन्हा संधी. मविआचा त्यांना पाठिंबा आहे. त्यांची लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी असेल. १३ उमेदवारांनी १९ अर्ज भरले आहेत.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीने पुन्हा विक्रम काळे यांनाच उमेदवारी दिली, तर भाजपने किरण पाटील यांना रिंगणात उतरवले. दोघांनीही अर्ज भरला. एकूण १५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेNashikनाशिकcongressकाँग्रेसBJPभाजपा