एकत्रित कुटुंब पद्धत काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 00:15 IST2022-02-08T00:15:33+5:302022-02-08T00:15:33+5:30
मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा विजया अवस्थी यांनी केले.

येथील उत्तर भारतीय महिला ब्राह्मण संघटनेतर्फे विठ्ठल मंदिरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना अवस्थी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वसुधा वाजपेयी या होत्या, तर निर्मला वाजपेयी, प्रगती शुक्ला, संगीता त्रिवेदी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमास प्रारंभ केला गेला. समाजाच्या उत्कर्षासाठी संघटन उभे करीत विविध उपक्रम राबविण्याचा महिला संघटनेचा प्रयत्न अनुकरणीय असल्याचे स्पष्ट करत अवस्थी यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे युवा पिढीवर होत असलेले दुष्परिणाम रोखण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी वसुधा वाजपेयी यांनी महिला संघटनेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक मंजू त्रिवेदी यांनी केले. कार्यक्रमास किरण मिश्रा, मंगला मिसर, माया मिसर, सरिता शुक्ला, श्रद्धा तिवारी, मंदा मिसर, श्वेता दुबे, संध्या मिश्रा, अनिता अवस्थी, राजश्री शुक्ला, सोनल मिसर, योगीता मिसर, हेमलता शुक्ला, अर्चना अवस्थी, श्रद्धा वाजपेयी, पूनम मिसर आदींसह महिला उपस्थित होत्या.