Nashik Crime News: इगतपुरी तालुक्यातील टिटोली रेल्वे क्वॉर्टर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा इगतपुरी पोलिसांनी शिताफीने शोध लावून त्यांना बिहार-नेपाळ सीमेवरून सुरक्षित ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेकर, उपअधीक्षक हरीश खेडकर व पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी व हवालदार दीपक निकुंभ यांच्यासह पथकाने तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मुली रेल्वेमार्गे बिहारच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी खासगी वाहनाने सलग २८ तासांचा प्रवास करत गुप्त माहितीच्या आधारे बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील भीमनगर (भारत-नेपाल सीमेवर) येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलींना ताब्यात घेतले.
मुली स्वेच्छेने गेल्या होत्या की कोणीतरी फूस लावून त्यांना पळवून नेले होते, याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांचन भोजने व त्यांचे पथक करत आहेत. दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Web Summary : Igatpuri police rescued two missing minor sisters from the Bihar-Nepal border after a 28-hour journey. The girls, who disappeared from Titoli, were located based on intelligence. An abduction case was filed, and investigations are ongoing to determine if they left willingly or were lured away. The girls are now safely reunited with their parents.
Web Summary : इगतपुरी पुलिस ने 28 घंटे की यात्रा के बाद बिहार-नेपाल सीमा से लापता दो नाबालिग बहनों को बचाया। टिटोली से गायब हुई लड़कियां खुफिया जानकारी के आधार पर मिलीं। अपहरण का मामला दर्ज किया गया है, और यह पता लगाने के लिए जांच जारी है कि वे स्वेच्छा से चली गईं या उन्हें बहला-फुसलाकर ले जाया गया। लड़कियां अब सुरक्षित रूप से अपने माता-पिता के साथ फिर से मिल गई हैं।