शिरसगाव शाळेत शिक्षक दिनी ‘थॅकस् अ टीचर’अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:40 IST2020-09-06T16:40:30+5:302020-09-06T16:40:30+5:30
कोकणंगाव : शिरसगाव ता. निफाड येथील जनता विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन गूगल मीट अॅपदवारे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.

शिरसगाव शाळेत शिक्षक दिनी ‘थॅकस् अ टीचर’अभियान
कोकणंगाव : शिरसगाव ता. निफाड येथील जनता विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन गूगल मीट अॅपदवारे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘थॅकस् अ टीचर’अभियान पार पाडले. त्या निमित्ताने शाळेत निबंध, चित्रकला व मनोगतातून शिक्षकांबद्दल असणारा आदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मुख्याध्यापक के. के. ह्याळीज यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. एस. डी. महाले, एम. सी. मोरे यांनी आपले अनुभव कथन केले. आयोजन शिंदे, पवार, बोचरे, मामा बोंबले यांनी केले होते. सुत्रसंचालन ए. बी. महाले यांनी केले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.