शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

बागलाण , मालेगाव तालुक्यातील साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित ; उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:46 IST

नितीन बोरसे/सटाणा : भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार यंदा जिल्हाधिकार्यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

नितीन बोरसे/सटाणा : भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार यंदा जिल्हाधिकार्यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.शासनाच्या टंचाई आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर , जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्यात येतात. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी पाणी टंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सर्व्हेक्षण अहवालात बागलाण व मालेगाव तालुक्यात आॅक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे हे सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानंतर मात्र पाण्याची पातळीत घट होऊन एिप्रल ते जून हे तीन महिने या साठ गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. टंचाई निवारणासाठी खबरदारीच्या उपाय योजना जिल्हाधिकाºयांनी संबधित गावांना पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्याचे आदेश दिले आहे. हे ३१ जुलै २०१८ पर्यंत लागू राहणार आहेत. घोषित केलेल्या गावांमध्ये बागलाण तालुक्यातील चिराई ,महड ,सारदे ,वायगाव , रातीर , देवळाणे ,सुराणे,राजपूरपांडे ,श्रीपूरवडे ,टिंगरी ,उत्राणे ,वडे खुर्द ,वाघळे ,ब्राम्हणपाडे ,जायखेडा ,जाखोड ,करंजाड ,लाडूद ,निताने ,सोमपूर ,आसखेडा ,द्याने ,फोपीर ,खिरमाणी,कोटबेल ,नामपूर ,अजमिरसौंदाणे ,कर्हे ,जुनी शेमळी ,लखमापूर ,यशवंतनगर ,अंतापूर ,दगडपाडा ,जामोटी ,मोराणे दिगर ,मुल्हेर ,रावेर ,ताहाराबाद ,वडे दिगर ,अलियाबाद ,बाभूळणे ,बोरदैवत ,कांद्याचा मळा ,खरड ,परशुरामनगर ,वाघंबे तसेच मालेगाव तालुक्यातील कजवाडे ,पोहाणे,विराणे,भायगाव ,अजंग ,कोठरे बुद्रुक ,सातमाणे ,वडनेर ,पांढरून या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक