ठाणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:32 IST2019-01-02T17:26:25+5:302019-01-02T17:32:37+5:30

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेत व समुहनृत्यासाठी जिल्हास्तरीय निवड झाली आहे.

 Thanganga school students are selected at the district level | ठाणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड

ठाणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक २०१८-१९ या केंद्रस्तरीय स्पर्धा नुकत्याच तालुक्यातील सोनांबे येथे पार पडल्या. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ठाणगांव या शाळेतील मुलानी लहान गट समूह नृत्य व लहान गट चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. इयत्ता चौथीची विद्यार्थीनी अंजली सुरेश पिचड हीने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिची जिल्हा पातळीवर निवड झाली.तर समूह नृत्यामध्ये सायली शिंदे, पायल काकड, अंकिता शिंदे, अनुराधा शिंदे, रणविजया भोर, कृष्णा शिंदे, कुणाल शिंदे, जय शिरोळे आदीनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापक महेश गायकवाड, काचंन साळुंके, माया सोनवणे, समीर आरोटे, संजय पगार, आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Thanganga school students are selected at the district level

टॅग्स :Schoolशाळा