जळगाव नेऊर : शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठकूबाई खंडेराव बुटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपसरपंच प्रकाश कुºहाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. सरपंच मोहनबाई बुल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ठकूबाई बुटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी श्याम वंजारी यांनी ठकूबाई बुटे यांची प्रतिस्पर्ध्याअभावी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेस ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कुºहाडे, दुर्गा हांडोरे, कारभारी वाघ, बाळासाहेब बुल्हे, सोमनाथ कानडे, भिकूबाई आजगे, लीलाबाई कानडे उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच ठकूबाई बुटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर शेवाळे, सतीश पाटील, नवनाथ हांडोरे, बापू बुल्हे, प्रभाकर बुल्हे, बाळू बिडवे, दत्तू वाकचौरे, भाऊराव हांडोरे, नितीन आजगे, दादा मुळे, हिरालाल कानडे, पवन कानडे आदी उपस्थित होते.
शिरसगाव लौकी उपसरपंचपदी ठकूबाई बुटे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:28 IST
जळगाव नेऊर : शिरसगाव लौकी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठकूबाई खंडेराव बुटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच प्रकाश कुºहाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली.
शिरसगाव लौकी उपसरपंचपदी ठकूबाई बुटे बिनविरोध
ठळक मुद्देठकूबाई बुटे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल