किरीट सोमैय्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, प्रतिमेला जोडेमार

By श्याम बागुल | Updated: July 18, 2023 19:35 IST2023-07-18T19:34:39+5:302023-07-18T19:35:06+5:30

काँग्रेसकडूनही कठोर कारवाईची मागणी

Thackeray group aggressive against Kirit Somaiyya | किरीट सोमैय्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, प्रतिमेला जोडेमार

किरीट सोमैय्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, प्रतिमेला जोडेमार

नाशिक : भाजपाचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची वादग्रस्त ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी सोमैय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला तर काँग्रेसने देखील पोलीस आयुक्तांना पत्र देत सोमैय्या यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोमैय्या यांचा एका महिलेसोबतचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला वर्गात संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी (दि.१८) सकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शालिमार चौकात तसेच पंचवटी कारंजा येथे किरीट सोमय्या यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Web Title: Thackeray group aggressive against Kirit Somaiyya