कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी कापडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:19 IST2019-12-22T21:50:39+5:302019-12-23T00:19:51+5:30

सिन्नर तालुका गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरुण बोडके, संपत जाधव, सचिव अरु ण महाले, संघटक रवींद्र जाधव, निफाड तालुका अध्यक्ष अनिल गडाख, सेवानिवृत्त पोलीसपाटील वाल्मीक कडवे, माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड आदी उपस्थित होते.

Textile unopposed as president of labor police association | कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी कापडी बिनविरोध

सिन्नर तालुका पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कापडी यांचा सत्कार करताना जिल्हा अध्यक्ष चिंतामण मोरे, अरुण बोडके, शिवाजी पोमणार, रवींद्र खरात, अर्चना भगत, विष्णू कापडी, मोहन सांगळे, भिकाजी गिते, संगीता काकड, तारा घुगे आदी.

नायगाव : सिन्नर तालुका गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरुण बोडके, संपत जाधव, सचिव अरु ण महाले, संघटक रवींद्र जाधव, निफाड तालुका अध्यक्ष अनिल गडाख, सेवानिवृत्त पोलीसपाटील वाल्मीक कडवे, माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड आदी उपस्थित होते.
तालुका अध्यक्षपदाची मुदत संपल्याने शुक्र वारी (दि.२०) झालेल्या तालुका पोलीस पाटलांच्या बैठकीत कापडी यांची एक वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्यध्यक्षपदी रवि सोनवणे, सचिव म्हणून सुभाष बैरागी, महिला प्रतिनिधी म्हणून भाग्यश्री पाटोळे, सविता त्रिभुवन, मनीषा कोकाटे, ज्योती तांबे आदींची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका उपाध्यक्ष मोहन सांगळे, शिवाजी पोमणार, रवींद्र खरात, सागर मुठाळ, अर्चना भगत, सुनंदा शेळके, मच्छिंद्र आव्हाड, मच्छिंद्र काळे, संगीता काकड, तारा घुगे, संदीप सानप, विष्णू कापडी, भिकाजी गिते आदी उपस्थित होते.

Web Title: Textile unopposed as president of labor police association