प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांना घेराव

By Admin | Updated: May 13, 2015 01:31 IST2015-05-13T01:31:30+5:302015-05-13T01:31:57+5:30

प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांना घेराव

Territorial officer Ramdas Khedkar detained | प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांना घेराव

प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांना घेराव

नाशिक : भूसंपादन कायदा रद्द करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहित करू नये आदि विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांना घेराव घातला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भूमी अधिग्रहण कायदा आणि इंडिया बुल्ससाठी होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन सकाळपासून आंदोलन छेडले होते. सकाळी नाशिकरोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे वळविला. या आंदोलनात निफाड, दिंडोरी आणि सिन्नर येथील शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Territorial officer Ramdas Khedkar detained