शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:07 IST

नाशिकमध्ये आयशर ट्रकला पाठीमागून जीपची धडक होऊन मोठा अपघात झाला.

अझहर शेख

नाशिक : निफाड तालुक्यातील धारणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून सिडकोकडे परतताना द्वारका चाैकाच्या अलीकडे उड्डाणपूलावर पुरूष भाविकांचा टेम्पो पाठीमागून लोखंडी सळ्यांच्या ट्रकवर (एम.एच२५ यू ०५०८) जाऊन आदळला. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून यामध्ये संतोष व अतुल मंडलिक या बापलेकाचाही समावेश आहे. तेरा भाविक गंभीररित्या जखमी झाले आहे. ही दुर्घटना रविवारी (दि.१२) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. मयत झालेले पाचही लोक सिडकोमधील रहिवासी होते.

नाशिक शहरातील सिडको सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले चेतन गंभीरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम (कारण) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी परिसरातील महिला व पुरूष हे दोन स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास करून नैताळेगावाच्या पुढे असलेल्या धारणगाव येथील धार्मिकस्थळी गेले होते. सायंकाळी कार्यक्रम आटोपून परतीचा प्रवास करताना अगोदर महिला भाविकांना घेऊन टेम्पो नाशिकच्यादिशेने रवाना झाला. हा टेम्पो सह्याद्रीनगर येथे पोहचून काही वेळ होत नाही, तोच पुरूषांच्या टेम्पोला (एम. एच१५ एफ.व्ही ५६०१) द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचा चक्काचूर झाला. कॅबिनमध्ये लोखंडी सळ्या शिरल्या. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस, वाहतूक शाखेचे पोलिस, अग्निशमन दलाचा बंब, १०८च्या तीन रूग्णवाहिकांसह काही खासगी रूग्णवाहिका वेगाने घटनास्थळी पोहचल्या. आपत्कालीन बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. काही जखमींना लेखानगरच्या खासगी रुग्णालयात तर काहींना शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

 मृतांची नावे अशी... 

१)अतुल संतोष मंडलिक (२२), २) संतोष मंडलिक (५६), ३) यश खरात, ४) दर्शन घरटे, ५) चेतन पवार (१७)

 जखमींची नावे अशी... 

१) सार्थक (लकी) सोनवणे, २) प्रेम मोरे, ३) राहुल साबळे, ४) विद्यानंद कांबळे, ५) समीर गवई, ६) अरमान खान, ७) अनुज घरटे, ८) साई काळे, ९) मकरंद आहेर, १०) कृष्णा भगत, ११) शुभम डंगरे, १२) अभिषेक, १३) लोकेश (दोघांची पुर्ण नावे समजू शकलेले नाही)

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक