ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:01 IST2020-12-01T21:16:41+5:302020-12-02T00:01:29+5:30

चांदोरी : तंत्रज्ञानानाने झपाटलेल्या युगात लहान मुलांचा ओढा संगणक, व्हिडिओ गेमकडे झुकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे.

The tendency of children in rural areas towards computer games | ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे

ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे

ठळक मुद्दे लंगडी, सापशिडी, मामाच पत्र, लगोरी या सारखे पारंपरिक खेल विस्मृतीत

चांदोरी : तंत्रज्ञानानाने झपाटलेल्या युगात लहान मुलांचा ओढा संगणक, व्हिडिओ गेमकडे झुकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे.

यामुळे मातीतले खेल तसेच लंगडी, सापशिडी, मामाच पत्र, लगोरी या सारखे पारंपरिक खेल विस्मृतीत गेले आहे. याचा विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आल्याने पालकांनी मुलांचा खेळाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पूर्वी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की सापशिडी, चल्लस, लगोरी, लंगडी आशा खेळांचे वेध लागत असत, मात्र सध्या ग्रामीण भागात इलेट्रॉनिक्स गेम, मोबाईल गेम खेळण्याकडे अधिक कल आहे. टीव्ही समोर तासनतास कार्टून मालिका पाहण्यात लहान मुलांचा वेळ जात आहे.
लंगडीला खेळ मुले आता पूर्णपणे विसरले असतील असे वाटते तर सापशिडी, चल्लस हे खेळ आता एकदम तुरळक ठिकाणी मुले खेळताना दिसतात. काळाच्या ओघात उन्हाळ्यातील खेल आता इतिहास जमा झाले आहेत.
त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. पूर्वी चार मुले एकत्र यायचे बुद्धिबळ, कॅरम किंवा सापशिडी मध्ये रमवायचे, यातुन अधिकाधिक बाल मित्र जवळ यायचे यातून एकप्रकारचे भावनिक नाते निर्माण होऊन ते संबंध आयुष्य भर जपले जायचे. पण आता मात्र असे होताना दिसत नाही. या खेळामुळे एकलकोंडी पणा वाढला असल्याचे दिसून येत आहे.

शहरी व ग्रामीण भागात इलेट्रॉनिकस गेम व मोबाईल गेम खेळण्यावरच भर दिसतो.या मुळे डोळ्यांचे आजार वाढत चालल्याचे चित्र आहे.
अँड्रॉइड गेम ला अधिक पसंती...
सर्वत्र अँड्रॉइड मोबाईल चे प्रचलन वाढले आहे व त्यातील गेमही अत्याधुनिक असल्याने ते खेळण्यावर अधिक भर असतो ,यात ग्रामीण भागातील मुले मागे नसल्याचे दिसून येत आहे ,या मुळे पारंपरिक खेळ आता नाहीसे होत आहे. (०१ गेम)

 

Web Title: The tendency of children in rural areas towards computer games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.