शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अ‍ॅपवर भाडेकरूंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:10 IST

घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असून, पोलिसांनी घरमालकांच्या सोयीसाठी ‘टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अ‍ॅप’ विकसित केले आहे. शहरातील दीड हजाराहून अधिक नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला असून, ९२५ घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती या अ‍ॅपवर टाकली आहे.

नाशिक : घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असून, पोलिसांनी घरमालकांच्या सोयीसाठी ‘टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अ‍ॅप’ विकसित केले आहे. शहरातील दीड हजाराहून अधिक नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला असून, ९२५ घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती या अ‍ॅपवर टाकली आहे. यापैकी ३४३ घरमालकांची नोंदणीप्रक्रियाही पूर्ण झाली आहे़ विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या दोन गुन्हेगारांची ओळख पटली आहे़ दरम्यान, ५६७ भाडेकरूंची नोंदणी प्रलंबित असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे़  घरमालकाने घरात भाडकरू ठेवल्यास त्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करावी लागते़ या प्रकारची नोंद न करणाºया घरमालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती मिळावी, असा यामागे हेतू आहे़ तर घरमालकांना भाडेकरूंची माहिती देणे सोपे व्हावे यासाठी शहर पोलिसांनी टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अ‍ॅपची निर्मिती केली आहे़ या अ‍ॅपद्वारे घरमालकांना माहिती भरणे अधिक सोपे झाले असून, त्यांनी भरलेली माहिती पोलिसांच्या ‘थर्ड आय’ या अ‍ॅपमध्ये लोड होते़ या अ‍ॅपच्या माध्यमातून पोलिसांकडे शहरातील भाडेकरूंची माहिती उपलब्ध असणार असून, त्याचा उपयोग त्यांना गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी होणार आहे़पोलीस ठाणेनिहाय भाडेकरूंची नोंदणीपोलीस ठाणे नोंदणी प्रलंबित मंजुरी मिळालीसरकारवाडा १८ ९ ९पंचवटी २९ २० ९आडगाव १३८ १९ ११२म्हसरूळ ७४ ६६ ८भद्रकाली ५ ५ ०मुंबई नाका २० २० ०गंगापूर २१ १४ ६सातपूर १४२ २९ १०८इंदिरानगर १४४ १३९ ०४अंबड १४० ९३ ४७नाशिकरोड १५७ १४४ १३उपनगर ३४ ६ २७देवळाली कॅम्प ३ ३ ०एकूण ९२५ ५६७ ३४३

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय