दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:52 AM2019-10-09T00:52:37+5:302019-10-09T00:53:35+5:30

नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.

Ten-year-old 'Silent' role will fill the banner | दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

दहा वर्षांची ‘मौनी’ भूमिका बनकरांना भोवणार

Next
ठळक मुद्देशेतकरीहित वाऱ्यावर : जनआंदोलनाच्या वेळी कुठे गेले होते, असा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचे माजी आमदार म्हणून दिलीप बनकर यांनी घेतलेली सोईस्कर मौनी भूमिकाच त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मारक ठरण्याची चिन्हे असून, शेतकरीहित व जनआंदोलनाच्या घोषणा फोल ठरल्याने मतदारांसमोर मते मागण्यासाठी जाताना बनकरांना या प्रश्नांवर मतदारच जाब विचारण्याच्या मानसिकतेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत आजी- माजी आमदारांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा विचार करून मतदार गेल्या काही वर्षांतील हिशेब मतदानातून चुकता करतात. त्यामुळे यंदा निफाड विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून दिलीप बनकरांनी गेल्या दहा वर्षांत जनसामान्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या सोईस्कर भूमिकांना उजाळा देण्यात येत आहे. मतदारसंघातील गावोगावच्या प्रश्नांवर बनकर यांनी साधलेल्या सोईस्कर मौनाचीदेखील चर्चा होऊ लागली आहे.
विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात बनकर पूर्णत: अपयशी ठरले असून, ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व ते करू इच्छितात त्या शेतकºयांच्या प्रश्नावरदेखील त्यांची भूमिका सोयीची ठरली आहे. कांदा व द्राक्ष उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील शेतकºयांचे कंबरडे मोडण्याचा निर्णय अनेकवार सत्ताधाºयांनी घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्यांनी आंदोलने केली; पण त्याकडे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याच पक्षातर्फे मतदारसंघातील लासलगाव, विंचूरलाच काय पिंपळगावनजीक, चांदवडला केल्या गेलेल्या आंदोलनांकडेही बनकर फिरकले नव्हते, असे पक्षाचे कार्यकर्तेच बोलून दाखवित आहेत. त्यामुळे निवडणूक आल्यावरच दारात येणाºयाला कसे पाठबळ द्यायचे, असा त्यांचा प्रश्न आहे.
कांद्याच्या निर्यातबंदीचा विषय असो वा कांदा साठवणूक, या दोन्ही प्रश्नांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी त्रस्त असताना बनकर यांनी बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
सरकारला सदरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी शेतकरी उत्सुक असताना बनकर यांनी बाजार समित्या बंद करण्याचा निव्वळ इशारा देऊन आपली तलवार म्यान केली. त्यामुळे अशा ‘मौनी’भूमिका घेणाºयांना निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार आहे काय, असा प्रश्न आता मतदारच विचारताना दिसत आहेत.रस्त्याची अक्षरश: चाळणीनाशिक-औरंगाबाद या राष्टÑीय महामार्गावर नैताळे ते पिंपळस रामाचेदरम्यान गेल्या काही वर्षांत प्रचंड खड्डे पडून अपघातांची मालिका सुरू झाली असताना एकदाही बनकर यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून ना जनआंदोलन छेडले ना सरकारला जाब विचारण्याची भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत ते निफाड या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. खुद्द बनकर यांनी या रस्त्याचा अनेकवेळा अनुभव घेतला असताना त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य का कळू शकले नाही, असा प्रश्न या परिसरातील मतदार विचारू लागले आहेत.

Web Title: Ten-year-old 'Silent' role will fill the banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.