Ten times a youth was killed in an accident near Fateh | दसवेळ फाट्याजवळ अपघातात युवक ठार

दसवेळ फाट्याजवळ अपघातात युवक ठार

लोहोणेर : येथे आपल्या मेव्हण्याकडे सलून व्यवसाय करीत असलेला नरेंद्र शिवराम हिरे हा युवक गुरुवारी आपल्या गावी जात असताना दसवेल गावाजवळ राजापूर फाट्या नजीक खडीने भरलेला ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात घडल्याने जागीच ठार झाला. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील मूळचा रहिवाशी असलेला नरेंद्र शिवराम हिरे (३५) हा युवक लोहोणेर येथे आपल्या मेव्हण्याकडे सलून व्यवसाय करीत होता. गुरुवारी सकाळी तो आपल्या मित्रा समवेत दुचाकीने ( एम. एच. ४१ जे. ३२४०) ने आपल्या गावी देशशिरवाडे येथे जात असताना सकाळी साडे अकराच्या दरम्यान दसवेल गावानजीक राजापूर फाट्या जवळ असलेल्या वीटभट्टी नजीक खडीने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नरेंद्र शिवराम हिरे हा जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र दिनेश पवार यांच्या पाठीला व कमरेला मार लागला. नामपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी लोहोणेर येथे नरेंद्र हिरे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. हिरे याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीण, मेव्हणे असा परिवार आहे.

Web Title: Ten times a youth was killed in an accident near Fateh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.