दहा हजार विद्यार्थी आज देणार ‘नीट’ परीक्षा

By Admin | Updated: May 7, 2017 01:10 IST2017-05-07T01:10:02+5:302017-05-07T01:10:43+5:30

नाशिक : शहरातील १९ परीक्षा केंद्रांवर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे.

Ten thousand students will give 'neat' examination today | दहा हजार विद्यार्थी आज देणार ‘नीट’ परीक्षा

दहा हजार विद्यार्थी आज देणार ‘नीट’ परीक्षा

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे १९ परीक्षा केंद्रांवर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवारी (दि. ७) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १० हजार ५०० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
नाशिक शहर व परिसरातीस सर्व केंद्रीय विद्यालयांसह के टीएचएम महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, संदीप फाउंडेशन, गुरू गोविंदसिंग महाविद्यालयांसारख्या सुमारे १९ परीक्षा केंद्रांवर नीट करण्यात आले असून, विद्यार्त्यांनी त्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर वेळवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेला उपस्थित राहण्याविषयीच्या सर्व सूचना ओळखपत्रावर नमूद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह संकेतस्थळावर करण्यात आलेल्या सूचनांचा सविस्तर अभ्यास करून परीक्षेला उपस्थित राहण्याची गरज आहे. परीक्षार्थींनी सकाळी साडेसात वाजताच परीक्षा स्थळी उपस्थित नोंदवणे आवश्यक असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी माहिती व परीक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत कोणतीही वस्तू अथवा उपकरण घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हातातील घड्याळही वापरण्यास मनाई करण्यात आली असून, वेळेचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रातील सर्व खोल्यांमध्ये घड्याळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एका परीक्षा केंद्रावर किमान ४ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राबाहेर मेटल डिटेक्टर तसेच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरकृत्याला बळी न पडता नैतिक मार्गाने परीक्षा देण्याची गरज आहे. नीट परीक्षेसंबंधी सूचनांचे पालन न करता परीक्षेदरम्यान गैरकृत्य अथव नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अशा गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचा परिपूर्ण फायदा करून घेत परीक्षा द्यावी, असा सल्ला वैद्यकीय अभ्यासक्रम शिक्षण शाखेतील तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: Ten thousand students will give 'neat' examination today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.