वणीत दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांदा आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:17 IST2019-09-28T17:17:26+5:302019-09-28T17:17:37+5:30
वणी - उपबाजारात गुरु वार व शुक्र वार या दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. गुरुवारच्या तुलनेत ...

वणीत दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांदा आवक
वणी - उपबाजारात गुरु वार व शुक्र वार या दोन दिवसात दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. गुरुवारच्या तुलनेत
शुक्र वारी दरात काहीशी सुधारणा झाली. गुरु वारी उपबाजारात २०५ वाहनामधुन सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.कमाल ३७८१ किमान २२५० तर सरासरी २४०० रु पये प्रति क्विंटल दराने कांदा व्यापारीवर्गाने खरेदी केला.तर शुक्र वारी १२३ वाहनामधुन तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली ३८५२, कमाल तीन हजार रु पये किमान तर ३५१५ सरासरी असा दर प्रति क्विंटल उत्पादकांना मिळाला. कांदा दरातील तुलनात्मक चढउतार व भावातील अस्थिरता हा व्यवहार प्रणालीचा एक भाग असुन सद्यस्थितीतील व्यापारी व उत्पादक यांचा आर्थिक समन्वय राहवा या करीता सदर खरेदी केलेला कांदा त्वरीत देशांतर्गत व्यापारी विक्रि साठी पाठवित आहे तर उत्पादकही मागणी व दर याचा विचार करु न साठवणुक केलेला कांदा उपबाजारात विक्र ी साठी आणत आहेत.