शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

मालेगाव मनपाचे दहा शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 11:29 PM

मालेगाव : येथील मनपा शिक्षण मंडळाच्या दहा शिक्षकांनी कोविन ॲप्लिकेशनवर लसीकरण नोंदणीचे काम करताना कर्तव्यात कसूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची गंभीर दखल घेत प्रशासन अधिकाऱ्यांनी दहा संशयित दोषी शिक्षकांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, शिक्षक संघटना हा आदेश मागे घेण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्याच्या पवित्र्यात आहे.

ठळक मुद्देलस न देताच प्रमाणपत्र : शिक्षण मंडळ प्रशासनाकडून गंभीर दखल

मालेगाव : येथील मनपा शिक्षण मंडळाच्या दहा शिक्षकांनी कोविन ॲप्लिकेशनवर लसीकरण नोंदणीचे काम करताना कर्तव्यात कसूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची गंभीर दखल घेत प्रशासन अधिकाऱ्यांनी दहा संशयित दोषी शिक्षकांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, शिक्षक संघटना हा आदेश मागे घेण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्याच्या पवित्र्यात आहे.मालेगाव महापालिका क्षेत्र पहिल्या टप्प्यात कोरोना हॉटस्पॉट ठरले होते. दुसऱ्या लाटेतही अनेकांना बाधा होऊन अनेकांचा जीव गेला. साथ आटोक्यात आणण्याबरोबरच संसर्ग साखळी तोडण्यासाठी लसीकरणाला गती देण्यात आली. ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उभारुन नागरिकांना प्रोत्साहित केले गेले. या कामासाठी मनपा शिक्षण मंडळातील शिक्षकांनाही नियुक्ती दिली गेली होती. त्यातील संगमेश्वर वॉर्ड लसीकरण मोहिमेदरम्यान दि. २ जुलै २०२१ रोजी १३ लाभार्थ्यांना कोविड लस न देताच त्यांचे कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन करून लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले गेले. ही बाब अहवालातून उघड झाली. लसीकरण झालेल्या लाभार्थीच्या तुलनेत लसीची एक व्हेल शिल्लक आली. चुकीचा अहवाल गेल्याची बाब नागरी आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांनी तक्रारीद्वारे निदर्शनास आणून दिली. त्याप्रमाणे झालेल्या चौकशीअंती प्रशासन अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत मुंबई प्राथमिक शिक्षक नियम १९४९ चे कलम ६३ (२) ब नुसार प्राप्त अधिकारातून १० शिक्षकांना दि.११ ऑक्टोबर २०२१ पासून निलंबित केले आहे.शिक्षक संघटना आक्रमकनिलंबित काळात या शिक्षकांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार असला तरी रोज सकाळी १० वाजता शिक्षण मंडळ कार्यालयात हजेरीबुकात स्वाक्षरी करावी लागणार आहे. मुख्यालय न सोडण्याचीही तंबी देण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, शिक्षण संघटना आक्रमक झाल्या आहेत. उर्दू शिक्षक संघाने आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदन सादर करीत या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. उपायुक्त, प्रशासनाधिकारी यांनाही निवदेन दिले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMalegaonमालेगांव