मालेगावी प्रदूषण नियंत्रणासाठी बसविणार दहा यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:34 IST2018-11-23T00:34:08+5:302018-11-23T00:34:55+5:30
मालेगाव : शहरातील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील लायन्स क्लब आॅफ मालेगाव व मालेगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दहा प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रण यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे वायु प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे.

मालेगावी प्रदूषण नियंत्रणासाठी बसविणार दहा यंत्र
मालेगाव : शहरातील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील लायन्स क्लब आॅफ मालेगाव व मालेगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दहा प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रण यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे वायु प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे.
शहरातील वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांना व लहान बालकांना त्रास होत आहे. प्रदुषण रोखण्याच्या उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. येथील लायन्स क्लब आॅफ मालेगावने सामाजिक बांधिलकी जोपासत महापालिकेला प्रदुषण नियंत्रण यंत्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. एका यंत्राची किंमत ७० हजार रूपये राहणार आहे. सुमारे ७ लाख रूपये खर्च करुन प्रदुषण नियंत्रण यंत्रे खरेदी केले जाणार आहेत. शहरातील वर्दळीचे व प्रदुषणाच्या ठिकाणी ही यंत्रे बसविली जाणार आहेत. प्रारंभी मोसमपूल, सटाणानाका, एकात्मता चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
प्रदुषण वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या व कचरा जाळणाºयांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.
महापालिका क्षेत्रातील अपंग व दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहेत. अपंगांसाठी ५ टक्के तर महिलांसाठी ३ टक्के निधी राखीव असतो. या निधीचा विनियोग करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.