रेल्वेत चोऱ्या करणा-या दहा भामट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 16:01 IST2018-04-24T16:01:10+5:302018-04-24T16:01:10+5:30

मनमाड : येथील रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेत प्रवाशांना मारझोड करून लुटणा-या वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश मिळाले आहे.

Ten bombs detonating the railway were arrested | रेल्वेत चोऱ्या करणा-या दहा भामट्यांना अटक

रेल्वेत चोऱ्या करणा-या दहा भामट्यांना अटक

मनमाड : येथील रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेत प्रवाशांना मारझोड करून लुटणा-या वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश मिळाले आहे. संशयितांकडून रोख रकमेसह मोबाइल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बंगळुरूकडून दिल्लीकडे जाणा-या कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये दौंड-अहमदनगरदरम्यान सर्वसाधारण डब्यात ६ तरुणांनी प्रवाशांना मारझोड करत लुटण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी धाडस करून चोरट्यांचा प्रतिकार करत चांगलाच चोप दिला. यातील चार चोरट्यांना प्रवाशांना पकडून रेसुब कर्मचाºयांना कळवले. सोमनाथ साळवे, सादिक शेख, ज्ञानदेव सोनटक्के आणि प्रभू वडिर्ले या चारही चोरट्यांंना रेसुब कर्मचाºयांनी ताब्यात घेतले. दुसºया घटनेत दिल्लीकडून बंगळूरकडे जाणा-या कर्नाटक एक्सप्रेस मध्ये तीन चोरटे धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी गाडीकडे धाव घेवून आरिफ तंबोळी, देवानंद महाजन आणि शाहरुख पठान या तिघांना पकडले. मुंबईकडे जाणाºया कामयानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे पाकीट मारताना मो. युनुस याला रंगेहात पकडले. शालीमार एक्सप्रेस मध्ये मनमाड-लासलगाव दरम्यान धावत्या गाडीत प्रवाशांना धाक दाखवून लुटणाºया दोन जणांना रेसुब कर्मचाºयांनी ताब्यात घेतले. रेसुबचे सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली रेसुब निरीक्षक के. डी. मोरे अश्विनी पटेल, ए. एन. देवरे, एल. आर. अलगुडे, शिवानंद गीते, सुरेन्द्र कुमार, समाधान गांगुर्डे, डी. के.तिवारी, बी. ए. पाटिल, नितीन तुपाके आदींनी चोरट्यांना पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Web Title: Ten bombs detonating the railway were arrested

टॅग्स :Nashikनाशिक