शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

तोरंगण घाटात टेम्पो उलटून, २५ जखमी

By admin | Updated: October 24, 2014 01:04 IST

तोरंगण घाटात टेम्पो उलटून, २५ जखमी

 

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर जवळील तोरंगण घाटात भांग्या देवाच्या पुढील वळणावर मजुरांनी भरलेला टेम्पो दरीत पलटी झाल्याने टेम्पोतील सुमारे २५ जण जखमी झाले. काही मजुरांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागेल असे डॉ. विठ्ठल काळे यांनी सांगितले. मोखाडा - जव्हार परिसरातील विविध वाड्या-पाडे येथील मजूर नाशिक येथे खडी फोडण्याच्या कामासाठी ४० कुटुंबे गेल्या वर्षभरापासून आले होते. सणासुदीसाठी हे सर्व मजूर आपापल्या घरी येत. असेच दिवाळी सणासाठी २० कुटुंबे घरी परतत होते. टेम्पो पलटी झाल्याने सुदैवाने ते वाचले. कोणी गंभीर जखमी झाले मात्र कुठलीही प्राणहानी झाली नाही.सायंकाळी ४.३०च्या दरम्यान रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात येऊ लागल्या. प्रथम ३ रुग्णवाहिका जखमी रुग्ण घेऊन आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य गावांमधील रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. जवळपास वीसपर्यंत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीना नाशिकला हलविण्यात आले. जखमींमध्ये देवीदास निवृत्ती वाघ (वय ४०, देहरा, जव्हार), हिरामण जानू वाघ (३०, देहरा, जव्हार), गंगाराम गोविंदा पवार (४०, शिवली, नांदगाव), जानकी गंगाराम पवार (५, शिवली नांदगाव), सुनील सोमा वाघ (२९, देहरा जव्हार), रामू जानू पवार ३५, जिवी रामू पवार (३०, देहरा जव्हार), बायडी किसन वळवी (१५ शिवली नांदगाव), रजी नवसु चेलम (४५, शिवली नांदगाव), रेखा राजू पवार (४५, शिवली नांदगाव), संतोष वसंत जाधव (३०), वसंत लक्ष्मण जाधव (४५), पिंटू रमेश पवार, लता चंद्रकांत दिवे ४५, सपना चंद्रकांत दिवे, संतू लखन जाखड ५० आदि जखमींचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलकुमार कुलथे, डॉ. विठ्ठल काळे, स्टाफ नर्स श्रीमती कुलथे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व जखमींवर उपचार केले. मोखाडा पोलीस हद्दीत अपघाताची जागा असल्याने मोखाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. हे सर्व मजूर नाशिक येथील ठेकेदार बिरजू जाधव यांच्याकडे काम करीत असल्याचे मजूर व त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्याच टेम्पोने हा अपघात घडल्याचे व चालक रामकिसन घोटे टेम्पो सोडून फरार झाल्याचे जखमींनी सांगितले. (वार्ताहर)भांग्या देवाच्या पुढील ठाणे हद्दीतील हे वळण धोकेदायक असून, या ठिकाणी वारंवार अपघात होतात. असे या भागातील लोक सांगतात. सा.बां. विभाग ठाणे यांनी हा भाग रुंद करावा व धोकेदायक वळण काढावे अशी मागणी या भागातील लोकांनी अनेकवेळा केली आहे.