टेम्पो दुभाजकावर आदळून एक ठार

By Admin | Updated: November 5, 2016 23:56 IST2016-11-05T23:55:00+5:302016-11-05T23:56:04+5:30

टेम्पो दुभाजकावर आदळून एक ठार

Tempo collapsed on a divider and killed one | टेम्पो दुभाजकावर आदळून एक ठार

टेम्पो दुभाजकावर आदळून एक ठार

घोटी : मुंबई महामार्गावर अपघातघोटी : मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास व्हीटीसी फाट्याजवळ विटा घेऊन येणाऱ्या टेम्पोला लक्झरी बसने कट मारल्याने टेम्पो दुभाजकावर चढूने पलटी झाल्याने कामगार सुनील मनोहर मोरे (२०, रा. गौळाणे) याचा जागीच ठार झाला.
शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास व्हीटीसी फाट्याजवळ विटा घेऊन येणाऱ्या टेम्पोला (क्र. एमएच ०५ एस १२५१) लक्झरी बसने कट मारल्याने टेम्पो दुभाजकावर चढून पलटी झाल्याने कामगार सुनील मनोहर मोरे (२०, रा. गौळाणे) याचा जागीच मृत्यू झाला. इतर कामगार किरण रसाळ (२१), सोमनाथ देवीदास गोरे (२२), विनोद शंकर वळवी (२०), टेम्पोचालक - मालक विजय शिवाजी कंकाळ जखमी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाडीवऱ्हे पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवक व जखमी गौळाणे येथील रहिवासी आहेत. (वार्ताहर)

Web Title: Tempo collapsed on a divider and killed one