शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:31 IST

पंटवटीतील सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांची तेलंगणा पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह नाशिक सराफ असोसिएशनने केली आहे. 

नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आलेले असताना या तपासादरम्यान पंटवटीतील विजय बुधू बिरारी यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांची तेलंगणा पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह नाशिक सराफ असोसिएशनने संघटनेच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२८) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. तेलंगणा पोलिसांच्या तपास पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीतील सराफ व्यावसायिक पंटवटीतील विजय बुधू बिरारी  यांना चौकशीसाठी सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.२५) पथकाच्या ताब्यात असताना बिरारी यांचा शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला. परंतु बिरारी यांचे लिगामेंटची शस्त्रक्रिया झालेली असून, वर्षभरापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना व्यवस्थित चालताही येत नसताना त्यांनी विश्रामगृहाच्या उंच भीतीवरून उडी मारलीच कशी, त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून शासकीय विश्रामगृहात कोणत्या कारणाने चौकशी करण्यात आली, तसेच तेलंगणा पोलिसांच्या चौकशीविषयी स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याविषयीही सराफ असोसिएशनने साशंकता व्यक्त केली असून, तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी विधीमंडळातही हा विषय उचलून धरण्यासाठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बिरारी कुटुंबीयांसोबत असहकार करणाºया पोलीस अधिकाºयांचीही चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सराफ असोसिएशनकडून देण्यात आली. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, उपाध्यक्ष मेहुल थोरात, सचिव गिरीश नवसे, राजेंद्र दिंडोरकर, सुनील महालकर, राजेंद्र कुलथे, कृष्णा नागरे, संजय दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकMurderखूनPoliceपोलिसChitra Waghचित्रा वाघBJPभाजपा