तहसीलदारांकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:42 IST2020-06-03T21:10:34+5:302020-06-04T00:42:17+5:30
इगतपुरी : कोरोनो संसर्गाचे संकट असतानाच आता महाराष्ट्रसह इगतपुरी तालुक्यात चक्र ीवादळासह पावसाचा तडाखा सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वमीवर आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी घाटनदेवी जवळील चेकपोस्टजवळ पाहणी दौरा केला.

तहसीलदारांकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी
इगतपुरी : कोरोनो संसर्गाचे संकट असतानाच आता महाराष्ट्रसह इगतपुरी तालुक्यात चक्र ीवादळासह पावसाचा तडाखा सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वमीवर आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी घाटनदेवी जवळील चेकपोस्टजवळ पाहणी दौरा केला.
यावेळी चक्र ी वादळ व त्यातच पावसाचा तडाखा जोरदार पाहावयास मिळाला. या चक्र ीवादळ व पावसामुळे चेकपोस्टवरील लोखंडी बॅरीकेड्स व पोलीस तंबू उडून गेला. तर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक घरांची पडझड झाली. तसेच गेल्या चोवीस तासांपासून तालुक्यात वीज गायब झाल्याचे पहावयास मिळाले. पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकही मंदावली होती. या पाहणी दौर्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फिरोज पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, ज्ञानेश्वर पासलकर, प्रथमेश पुरोहित, विजय कुंडकर, रितेश शिंदे, प्रवीण कदम, मकसूद खलिफा आदी उपस्थित होते.