शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन किलोमीटर पायपीट करत तहसीलदारांनी पोहचवली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:28 IST

पेठ - बेहेडपाडा नाशिक जिल्ह्याच्या पाश्चिम सीमावर्ती भागातील सर्वात अतिदुर्गम पाडे. गावापर्यंत पोहचायला धड रस्ताही नाही अशा परिस्थितीत यशोदिप सामाजिक संस्थेच्या सहकार्याने स्वत: तहसीलदार हातात जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट घेऊन तीन किमी पायपीट करत या गावापर्यंत पोहचले आणि गरजूंना मदतीचा हात दिला.

पेठ - बेहेडपाडा नाशिक जिल्ह्याच्या पाश्चिम सीमावर्ती भागातील सर्वात अतिदुर्गम पाडे. गावापर्यंत पोहचायला धड रस्ताही नाही अशा परिस्थितीत यशोदिप सामाजिक संस्थेच्या सहकार्याने स्वत: तहसीलदार हातात जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट घेऊन तीन किमी पायपीट करत या गावापर्यंत पोहचले आणि गरजूंना मदतीचा हात दिला.आदिवासी भागातील उच्चशिक्षण घेऊन शासकिय सेवेत असलेल्या नोकरदार अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट, घनशाम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदिप बहुद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना केली. सद्या कोरोनामुळे संकटात सापडलेल्या ५०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बेहेडपाडा गावात तहसीलदार संदिप भोसले संस्थेच्या सदस्यांसह डोक्यावर ओझे घेऊन तीन किमी पायपीट करत गावात पोहचले आणि शेतमजूरांना मदत पोहच केली. पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीचीबारी, पाहुचीबारी, आमडोंगरा, चौकडा, विहीरीची आळी, शिंगदरी, तांदळाचीबारी, देवडोंगरा, गोळसपाडा यासह इतर गावातील गरजवंताना संकटकाळी यशोदिपने मदत पोहचवली.याप्रसंगी यशोदीप संस्थेचे अध्यक्ष गिरीश गावीत, डॉ. योगेश भरसट, घनशाम महाले, राजेंद्र भोये,महेश तुंगार,रमेश चौधरी,राजेश भोये, देवदत्त चौधरी,धनराज सगणे ,गोवर्धन खंबाईत,विजय तरवारे,मुरलिधर चौधरी,पुंडलिक सातपुते, जनार्दन खोटरे, दिलीप भूसारे, विलास कुवर, प्रकाश गवळी, विजय वाघेरे, राहुल खंबाईत, दिपक हलकंदर, विद्याधर गवळी, सुभाष भुसारे, ओमप्रकाश भोयेयांचेसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.-----------------पेठ तालुक्यात सद्या कामावर गेलेले शेतमजूर गावावर आले असून हाताला काम नसल्याने त्यांना काही दिवस शासकिय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दतीचा ओघ सुरू आहे. सोशल नेटवर्किंग फोरमने दोन हजार तर यशोदीप सामाजिक संस्थेने जवळपास ५०० कुंटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे. इतर ठिकाणीही अनेक दानशूर सामाजिक दायित्व निभावत आहेत.-संदिप भोसले, तहसीलदार पेठ

टॅग्स :Nashikनाशिक