सटाण्यात तरु ण विवाहितेची आत्महत्त्या
By Admin | Updated: September 24, 2016 00:33 IST2016-09-24T00:31:29+5:302016-09-24T00:33:00+5:30
सटाण्यात तरु ण विवाहितेची आत्महत्त्या

सटाण्यात तरु ण विवाहितेची आत्महत्त्या
सटाणा : शहरातील एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. फरहीन सुलतान शेख (३४) असे तिचे नाव आहे. ती शहरातील बसस्थानकामागील आर.के.नगर परिसरात राहत होती. पती गवंडी कामावर गेलेला असताना मुले बाहेर गेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तिने घराचे आतून दार बंद केले आणि गळफास लावून घेतला. आई दार उघडत नसल्याचे बघून मुलांनी जवळील एका नातेवाइकाला बोलावून आणले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. आत्महत्त्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. (वार्ताहर)