शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडच्या इमारत बांधकाम निविदेत तांत्रिक चूकच

By admin | Updated: September 22, 2016 01:15 IST

प्रशासनाची कबुली : चार महिन्यानंतर उघडली निविदा

नाशिक : चांदवड प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा तब्बल चार महिन्यानंतर उघडण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ही तांत्रिक चूक असल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे पदावर नसलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून बदली झाल्यानंतर या कामाची निविदा उघडण्यात आल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.यासंदर्भात महेंद्र साळवे नामक सुशिक्षित बेराजगार अभियंत्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात चांदवड पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया तांत्रिक व प्रशासकीयदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप केला होता. चांदवड पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३० एप्रिलपर्यंत निविदा मागविण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर नियमाप्रमाणे रीतसर आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असताना, चक्क ७ सप्टेंबरला ही निविदा उघडण्यात आली. त्यातही निविदाप्रक्रिया काळात पदावर असलेले कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी पदभार सोडण्याआधी निविदा का उघडली नाही. ते पदावर नसताना ७ सप्टेंबरला ही निविदा उघडण्यात येऊन यात अनियमितता झाल्याने फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शासन निर्णयानुसार १२० दिवसांपर्यंत निविदा उघडण्यात आली नाही किंवा निविदेची कार्र्यवाही झाली नाही, तर नव्याने निविदाप्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. प्रशासनाने १२० दिवसात निविदा उघडली नाही तर नव्याने फेरनिविदा काढण्याचा शासन नियम असून, या प्रकरणात तांत्रिक चूक झाल्याची कबुली दिली आहे; मात्र प्रशासनाच्या मंजुरीनेच मागील काळातील कार्यकारी अभियंत्यांची डिजिटल सिग्नेचर वापरण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. चार महिन्यांनंतर पदावर नसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने उघडलेल्या या निविदेमुळे सुमारे दोन कोटी ९७ लाखांचे हे बांधकाम वादात सापडले आहे. त्यामुळेच आता या कामाची फेरनिविदा काढण्याबाबत प्रशासन स्तरावरून विचार सुरू आहे. (प्रतिनिधी)