कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी जुन्या नाशकाच्या वाटा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:01 PM2020-07-11T17:01:52+5:302020-07-11T17:02:29+5:30

काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

To tease | कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी जुन्या नाशकाच्या वाटा बंद

कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी जुन्या नाशकाच्या वाटा बंद

Next
ठळक मुद्देकोरोनाचा वाढता फैलाव आणि नागरिकांची उदासिनतारस्तेबंदीची वेळ येणे ही मोठी धोक्याची घंटा

नाशिक : महिनाभरापासून जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असून मोठ्या संख्येने बाधित रूग्ण आढळून आले तसेच याच भागातील बहुतांश कोरोना रूग्ण मृत्यूमुखी पडले; कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या आयुक्तांनी दौरा करून या परिसराचा ‘संपर्क’ तोडण्यासाठी जुन्या नाशकात येणाऱ्या वाटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, बागवानपुरा, काजीपुरा, चौक मंडई, नानावली, कथडा, मोठा राजवाडा या सर्वच भागात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढली. जुन्या नाशकात वेगाने फैलावणा-या कोरोनाला नियंत्रणात आणायचे तरी कसे? असा यक्ष प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला. कारण प्रचंड दाट लोकवस्ती, अरूंद गल्लीबोळ आणि घरे, शिक्षणाचा आणि सामाजिक नितीमुल्यांचा अभाव यामुळे या भागात कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. अद्यापही कोरोनाचे रूग्ण या भागात आढळून येतच आहे. जुन्या नाशकातील कोरोना रूग्णांची शंभरी पार झाली असेल.

काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. परिणामी शुक्रवारी (दि.१०) मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या भागाचा पुन्हा पाहणी दौरा करून जुन्या नाशकात जाणारे रस्ते तत्काळ बॅरिकेडिंग लावून बंद करण्याचे आदेश दिले. यानुसार आता केवळ मेनरोड, दहिपूल, सरस्वती नाला, तिवंधालेन, भद्रकाली या भागातूनच जुन्या नाशकात ये-जा करण्याचे मार्ग मोकळे ठेवले गेले आहेत. उर्वरित सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहे.

येथून प्रवेश बंद
सारडासर्कलवरून दूधबाजार, चौकमंडईत जाणारे दोन्ही रस्ते. द्वारकावरून नानावली, बागवानपु-यात जाणारा रस्ता, तसेच फाळकेरोड, शिवाजीचौकातून तिगरानियाकडे जाणारा रस्ता, खडकाळी सिग्नल, वडाळानाका येथून जुन्या नाशकात येणारे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले. एकीकडे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असतानाही या भागात मात्र रस्तेबंदी करण्याची वेळ येणे ही मोठी धोक्याची घंटा आहे. यावरून जुन्या नाशकात कोरोनाचा वाढता फैलाव आणि नागरिकांची उदासिनता सहज लक्षात येते.


 

 

Web Title: To tease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.