नाशिकच्या डॉक्टरांचे पथक रुग्णसेवेसाठी सीमेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:21+5:302021-05-08T04:14:21+5:30
नाशिकप्रमाणे तिथेदेखील कोरोना झपाट्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले असल्याने नाशिकचे तज्ज्ञपथक तेथे जाऊन त्यांना तज्ज्ञ सेवा ...

नाशिकच्या डॉक्टरांचे पथक रुग्णसेवेसाठी सीमेवर
नाशिकप्रमाणे तिथेदेखील कोरोना झपाट्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले असल्याने नाशिकचे तज्ज्ञपथक तेथे जाऊन त्यांना तज्ज्ञ सेवा देणार आहेत.
नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे कुपवाडा येथे एक आधुनिक ईसीजी मशीन व एक मल्टीपॅरा मॉनिटर देणगी स्वरूपामध्ये दिले गेलेले आहे, तसेच साधारण ५ लाख रुपये किमतीची विविध प्रकारची औषधे, गोळ्या, मलम, आय ड्रॉप हे रेल्वे व रस्ता वाहतुकीद्वारे आधीच कुपवाडा येथे पोहोचलेले आहे.
या तिन्ही सीमांलगत भागांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे तेथील जनतेला या वैद्यकीय निदान उपचार शिबिराची गरज लक्षात घेऊन मराठा मिल्ट्री रेजिमेंटच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वैद्यकीय पथकात डॉ. समीर चंद्रात्रे, डॉ. सुनील जगताप, डॉ. अमरजा जगताप, डॉ. परीक्षित महाजन, डॉ. गौरी महाजन, डॉ. सत्यप्रकाश महाजन, डॉ. हेमांगी महाजन, डॉ. प्राजक्ता लेले, डॉ. अनिल पवार, डॉ. प्रतीक्षा पवार, डॉ. शीतल जाधव आणि सहायक स्टाफ असे २० जणांचे पथक शुक्रवारी रवाना झाले.
इन्फो
जवानांसह सीमेनजीकच्या नागरिकांना लाभ
माजी आयएमए अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे आणि ऋषिकेश परमार (बॉर्डरलेस फाउंडेशन ऑफ इंडिया सेक्रेटरी) यांनी पुढील काही महिन्यात अशाच पद्धतीचे आणखी भव्य शिबिर घ्यायचे नियोजनसुद्धा केले आहे. तत्पूर्वी हे शिबिर कोरोना काळात असल्याकारणाने तेथील जनतेला व आपल्या सैन्यातील जवानांना याचा खूप फायदा होईल आणि आमची सेवा त्यांच्या उपयोगी पडेल, असा विश्वास पथकाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. साधारण दहा दिवसांच्या या शिबिरानंतर नाशिकची ही डॉक्टरांची टीम १९ तारखेला पुन्हा नाशिकमध्ये परतून नाशिककरांच्या सेवेत कार्यरत होणार आहे.