विद्यार्थ्यांचे लसीकरणाची शिक्षक संघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:42+5:302021-09-07T04:17:42+5:30
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची त्यांच्या निवासस्थानी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. ...

विद्यार्थ्यांचे लसीकरणाची शिक्षक संघाची मागणी
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची त्यांच्या निवासस्थानी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विद्यार्थी लसीकरण मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, सरचिटणीस धनराज वाणी, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे आदींच्या सह्या आहेत. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष, राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
फोटो - ०६ पेठ १
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन देताना प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, बाजीराव सोनवणे, प्रदीप पेखळे, सचिन वडजे, निंबा बोरसे, उमेश बैरागी आदी.
060921\06nsk_4_06092021_13.jpg
केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन देतांना प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जून ताकाटे, बाजीराव सोनवणे, प्रदिप पेखळे, सचिन वडजे, निंबा बोरसे, उमेश बैरागी आदी.