शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:20 AM

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.

नाशिक : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होती. तत्कालीन मंत्रिमंडळाने ११ आॅक्टोबर २००५ रोजी निर्णय घेऊन दिनांक १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू होणाºया कर्मचाºयांसाठी १९८२ ची जुनी पेन्शन योजना रद्द केली व त्यानंतर डी.सी.पी.एस. योजना लागू केली. शासनाच्या या निर्णयाला महाराष्टÑ कायदेमंडळाची मान्यता मिळालेली नसल्याने अंशदायी पेन्शन योजना जबरदस्तीने थोपविण्यात येत आहे. सदर योजनेच्या कायदेबाह्य सक्तीमुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर अन्याय होत आहे तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार या शाळांना टप्प्याने अनुदान वितरित करण्यात आले. त्यामुळे या सर्व शाळा सन २००७ मध्ये शंभर टक्के अनुदानावर आल्या याचा ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयात कुठेही उल्लेख नसताना दि. २९ नोव्हेंबर २०१० च्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाने पूर्वलक्षी प्रभावाने अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील जवळपास ५०००० कर्मचाºयांना वंचित ठेवले आहे. अशा सर्व कर्मचाºयांची सहाव्या वेतन आयोगातील थकबाकी १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरसुद्धा सस्पेन्समध्येच आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने शासनाच्या या आदेशाला स्थगिती दिली असून, १ नोव्हेंबर २००५ पूर्वनियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना नवीन डीसीपीएस योजना लागू होऊ शकत नाही तरीही शासनाने भविष्य निर्वाह निधीचे खाते बंद केले आहे. सदर खाते तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात अशोक सोमवंशी, मंगेश सूर्यवंशी, संगीता शिंदे, नलिेश ठाकूर, संजय देसले, दिनेश अहिरे, योगेश पाटील, श्रावण साठे, नितीन पाटील, नारायण दिगंबर, सुगंधा सोनवणे, दत्तात्रय सांगळे, नरेंद्र शिरसाट, सचिन पगार, देवदत्त अहिरराव सहभागी झाले होते.शिक्षकांचाही पायी लॉँग मार्चशेतकºयांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी किसान सभेने काढलेल्या नाशिक ते मुंबई लॉँग मार्चच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांनी येत्या १७ मे पासून शहापूर ते मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सहकुटुंब लॉँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास तिसºया टप्प्यात आझाद मैदान येथेच कर्मचारी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षक