पेठरोडला शिक्षिकेची सोनसाखळी ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:10 IST2021-02-24T23:18:54+5:302021-02-25T01:10:16+5:30

पंचवटी : शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी संशयितांनी ओरबाडून पळ काढल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

The teacher's gold chain was found on Peth Road | पेठरोडला शिक्षिकेची सोनसाखळी ओरबाडली

पेठरोडला शिक्षिकेची सोनसाखळी ओरबाडली

ठळक मुद्देअर्धा तोळ्याची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून पलायन केले.

पंचवटी : शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी संशयितांनी ओरबाडून पळ काढल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पेठरोडवरील मखमलाबाद चौफुलीपासून पुढे गायकवाड मळा येथील रहिवासी वंदना भगवान महाले या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत शिक्षक आहेत. त्या बुधवारी (दि.२४) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घरी पायी जात होत्या. यावेळी मागून दुचाकीने भरधाव आलेल्या दोघा अज्ञात संशयितांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून पलायन केले. या घटनेनंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी भेट देत तत्काळ नाकेबंदी करत संशयित वाहनचालकांची तपासणी सुरू केली; मात्र उशिरापर्यंत शहरात कोठेही सोनसाखळी चोर पोलिसांच्या हाती लागले नाही.

Web Title: The teacher's gold chain was found on Peth Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.