वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:04+5:302021-09-07T04:18:04+5:30

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त रतन पाटील वडघुले, ॲड. दिलीप वाघवकर, विश्वास कराड, वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य ...

Teacher's Day celebrations at Vaintay Vidyalaya | वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन सोहळा

वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन सोहळा

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त रतन पाटील वडघुले, ॲड. दिलीप वाघवकर, विश्वास कराड, वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, पर्यवेक्षक एन. डी. शिरसाट, प्राचार्य देवेंद्र सांबरे, मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता तनपुरे, मुख्याध्यापिका प्रसन्ना कुलकर्णी, मुख्याध्यापक सी. एस. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते

प्रारंभी सरस्वती माता, न्या. रानडे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

प्रास्तविक प्राचार्य एस. पी. गोरवे यांनी केले. याप्रसंगी वि. दा. व्यवहारे, रतन पाटील-वडघुले, बाळकृष्ण ठोके, सौ. कविता जडे, गोरख सानप, एस. एम. बोराडे यांची भाषणे झाली. विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी जाधव हिने तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने बाळकृष्ण ठोके, सुभाष खाटेकर, प्रा. जमशेदा शेख, किसन चौधरी, दावचवाडी, सौ. पल्लवी सानप, गोरख सानप, सौ. वैशाली सोनवणे यांना शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन किरण खैरनार यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य देवेंद्र सांबरे यांनी केले.

फोटो - ०६ वैनतेय स्कूल

वैनतेय विद्यालयात आयोजित शिक्षक दिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना वि. दा. व्यवहारे. व्यासपीठावर रतन पाटील-वडघुले, ॲड. दिलीप वाघवकर, विश्वास कराड, प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, पर्यवेक्षक एन. डी. शिरसाट, प्राचार्य देवेंद्र सांबरे , मुख्याध्यापक सी. एस. वाघ आदी. उपस्थित होते.

060921\06nsk_19_06092021_13.jpg

फोटो - ०६ वैनतेय स्कूल 

Web Title: Teacher's Day celebrations at Vaintay Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.