शिक्षक भावी पिढीचे शिल्पकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:53+5:302021-09-06T04:18:53+5:30
जनता इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज दिंडोरी या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून वडजे बोलत ...

शिक्षक भावी पिढीचे शिल्पकार
जनता इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज दिंडोरी या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून वडजे बोलत होते.
यावेळी उपप्राचार्य यु. डी. भरसट , पर्यवेक्षक यु. डी. बस्ते यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शालेय मंत्रिमंडळातील पंतप्रधान कुमारी सानिका हेमंत बोरस्ते, अथर्व रंधे व शालेय मंत्रिमंडळ यांच्या हस्ते प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राथमिक , माध्यमिक व ज्यु. कॉलेज विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक श्रीमती अहिरे व्ही. एस. यांनी केले. श्रीमती एस. एम. विरकर यांनी आभार मानले.
फोटो- ०५ दिंडोरी जनता स्कूल
दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्राचार्य आर. सी. वडजे, उपप्राचार्य भरसट यांचे समवेत शिक्षक व विद्यार्थी.
050921\05nsk_35_05092021_13.jpg
फोटो- ०५ दिंडोरी जनता स्कूल