टाकळी विद्यालयात शिक्षक-पालक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST2021-07-31T04:15:54+5:302021-07-31T04:15:54+5:30

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. पी. शिंदे होते. सरपंच महेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ...

Teacher-parent meeting at Takli Vidyalaya | टाकळी विद्यालयात शिक्षक-पालक सभा

टाकळी विद्यालयात शिक्षक-पालक सभा

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. पी. शिंदे होते. सरपंच महेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डी. एस. सावंत यांनी केले. मुख्याध्यापक शिंदे, वरिष्ठ लिपिक बी. एम. निकम व शिक्षकांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून भूषण दाते यांची, तर शरद लक्ष्मण माळी यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. पालकांचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्याध्यापक एस. जी. शेवाळे यांनी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. आठवी ते दहावी या वर्गांना कोविड-१९ चे नियम पाळून व विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन अध्यापनास सुरुवात केली असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. सूत्रसंचालन सावंत यांनी केले. आभार अमृतकर यांनी मानले.

Web Title: Teacher-parent meeting at Takli Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.