शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणीतून सूट मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 6:10 PM

ज्या मुख्याध्यापकांची व ज्येष्ठ शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल किं वा आजारपणाने ते त्रस्त असतील अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणी कामातून सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा मुख्याध्यापक संघाचि मागणी

सिन्नर : ज्या मुख्याध्यापकांची व ज्येष्ठ शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल किं वा आजारपणाने ते त्रस्त असतील अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणी कामातून सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे करण्यात आली आहे.जिल्हा मुख्याध्यापक संघ व महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाची बैठक सचिव उपासने यांच्या अध्यक्षतेखााली पार पडली. शाळा मान्यतावर्धित व कायम हा प्रश्न निकाली काढावा, शाळांकडून मान्यता कायम करण्यासाठी फक्त २ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी फी आकारणी करावी आदी मागण्यांकडे उपासनी यांचे लक्ष वेधण्यात आले. सकारात्मक दृष्टिकोनातून मंडळात आलेल्या प्रत्येक मुख्याध्यापक ांना सन्मानाची वागणूक मिळेल, कामे करण्यासाठी थेट माझ्याशी संपर्क साधा, असे सांगत मान्यतावर्धित व कायम हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल, मंडळाच्या पेपर तपासणीचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन उपासनी यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. केंद्र समायोजन, नवीन इंडेक्स फाइल, तक्रार निवारण कक्ष, शाळा तपासणी, नवीन केंद्र निर्मिती, दंड आकारणी ही सर्व कामे आठ दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन उपासनी यांनी दिले.यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, गुफरान अन्सारी, सुरेश शेलार, उपाध्यक्ष माणिक मडवई, बी. के. शेवाळे, राजेंद्र सावंत, पुरुषोत्तम रकिबे, शेख परवेझा, एस. डी. वाघ, किरण पगार, एम. व्ही. बच्छाव, बी. डी. गांगुर्डे, सचिन पगार, के . टी. उगलमुगले, साची शेवाळे, एल. शिंदे, सखाराम जाधव, एच. बी. नळे, ए. पी. पिंगळे, डी. एस. ठाकरे, नंदराज देवरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी प्रास्तविक केले. एस. के. सावंत यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक