शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

१०० कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 1:33 AM

महापालिकेत गाजलेल्या देवळाली शिवारातील आरक्षित भूखंडाला भलताच सर्व्हे नंबर दाखवून झालेला कथित सुमारे १०० कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा तसेच अन्य टीडीआर घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात नगरविकास मंत्रालयाचे पत्र नाशिक महापालिकेला प्राप्त झाले असून, त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देनगरविकास खात्याचे पत्र : महापालिका प्रशासनाकडून मागविला अहवाल

नाशिक : महापालिकेत गाजलेल्या देवळाली शिवारातील आरक्षित भूखंडाला भलताच सर्व्हे नंबर दाखवून झालेला कथित सुमारे १०० कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा तसेच अन्य टीडीआर घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात नगरविकास मंत्रालयाचे पत्र नाशिक महापालिकेला प्राप्त झाले असून, त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.नाशिक महापालिकेत एकापेक्षा एक सरस टीडीआर घोटाळे चर्चेत आले आहेत. मात्र त्यावर अखेरपर्यंत चौकशी होऊन कारवाई न झाल्याने संबंधितांचे फावले आहे. मात्र आता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गाजत असलेल्या भूखंड घोटाळ्यात आता थेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्याने त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेत गाजलेल्या या घोटाळ्याबाबत आधी अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयातदेखील धाव घेतली आहे, तर नंतर शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी या प्रकरणासह अन्य अनेक प्रकरणे स्थायी समिती आणि महासभेत उपस्थित केलीहोती.यासंदर्भात स्थायी समितीने एक चौकशी समिती नियुक्त केली असली तरी त्याचे कामकाज रखडले आहे. दरम्यान, बडगुजर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यांनी केली आहे. त्या अनुषंगाने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे शासनाच्या उपसचिवांचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.महापालिका क्षेत्रातील देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१अ (पार्ट)मधील क्षेत्र १५ हजार ६३० चौरस मीटरवरील आरक्षण क्रमांक २२० व २२१ हे क्षेत्र महापालिकेला विनामूल्य देण्यासाठी संबंधित जागामालकाने राज्य शासनाला हमी देऊन नजराणा कमी करून घेतला; मात्र प्रत्यक्षात टीडीआरद्वारे मोबदला घेतला आहे. विशेष म्हणजे टीडीआर देतानादेखील घोटाळा झाल्याचा आरोप आहे.या जागेचा शासकीय बाजारमूल्य दर ६ हजार ५०० रुपये प्रतिचौरस मीटर असा असताना तत्कालीन आयुक्त व नगररचना सहाय्यक संचालकांनी तो २५ हजार १०० प्रति चौरस मीटर दर्शवून जागामालकास ज्यादा रकमेचा टीडीआर देण्यात आला. या प्रकरणात ७५ कोटी रुपयांचा जादा टीडीआर देऊन महापालिकेची फसवणूक केली गेली, असा आरोप आहे.देवळाली शिवारातील रेल्वेचा आरक्षित भूखंडदेवळाली शिवारात रेल्वे विभागासाठी आरक्षित भूखंड होता. नियमानुसार ज्या विभागासाठी भूखंड आरक्षित असेल त्याच प्राधिकरणाने मोबदला देऊन तो ताब्यात घेण्याची गरज असताना महापालिकेने या भूखंडासाठीदेखील कोट्यवधी रुपयांचा मोबदला दिला, अशी तक्रार बडगुजर यांनी नगरविकासमंत्र्यांकडे केली होती. यासह अन्यही काही टीडीआर प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी बडगुजर यांनी शासनाकडे केली होती. नगरविकास राज्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार