खासगी वाहनातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कर

By Admin | Updated: March 28, 2017 23:57 IST2017-03-28T23:57:00+5:302017-03-28T23:57:16+5:30

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे दरडोई दोन रुपये कर आकारला जाणार आहे.

Taxes for the devotees coming from a private vehicle for a visit | खासगी वाहनातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कर

खासगी वाहनातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कर

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे दरडोई दोन रुपये कर आकारला  जाणार आहे. आज, गुढीपाडव्यापासूनच टोल आकारणीला प्रारंभ करण्यात आला.
सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांना नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला आर्थिक मर्यादा येत असून, उत्पन्नाचा स्रोत म्हणून भाविकांच्या वाहनांवर व भाविकांवर कर आकारण्याची मुभा मिळावी, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली होती. याविषयी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे हा निर्णय घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने कर आकारणीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार व ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाहीनुसार कर आकारणीबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला देण्यात आले. गडावर भगवतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायतीकडून नागरी मूलभूत सोयी सुविधा देताना वार्षिक उत्पन्न तुटपुंजे असल्याने अडचणी येतात तसेच सप्तशृंगीदेवी ट्रस्टकडूनही ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जात नाही. शासनाकडून मिळणारा निधी अत्यल्प आहे.  त्यामुळे ग्रामपंचायतीकडून भाविकांना नागरी सोयी सुविधा देताना अल्प उत्पन्न आणि कमी उत्पन्न स्रोतामुळे सप्तशृंगगड ग्रामपंचायतीची आर्थिक ओढाताण होत असल्याने भाविकांकडून दरडोई दोन रु पये घेण्याचे ठरविले आहे. या कराच्या उतपन्नातून भाविकांकरिता सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहणार आहे. सार्वजनिक वाहन, एस.टी. बस, शासकीय वाहनातील प्रवासी तसेच अपंग व लहान मुले या करातून वगळण्यात येणार आहे. सप्तशृंगगडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी व पर्यटनस्थळ म्हणून येथे येत असतात तसेच सुट्टीच्या काळात हीच गर्दी तिपटीने वाढत असते. त्यामुळे
दरडोईचा कर हा नक्कीच सोयी  सुविधा पुरविण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे़ (वार्ताहर)

Web Title: Taxes for the devotees coming from a private vehicle for a visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.