व्यापरी उद्योजकांच्या समस्य सोडविण्यासाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:35+5:302021-05-14T04:15:35+5:30

नाशिक- कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी राज्य शासनापाठोपाठ जिल्हा प्रशासनाने देखील १२ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली लाट, ...

Task Force to solve the problems of commercial entrepreneurs | व्यापरी उद्योजकांच्या समस्य सोडविण्यासाठी टास्क फोर्स

व्यापरी उद्योजकांच्या समस्य सोडविण्यासाठी टास्क फोर्स

googlenewsNext

नाशिक- कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी राज्य शासनापाठोपाठ जिल्हा प्रशासनाने देखील १२ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली लाट, दुसरी लाट अशाप्रकारे एकेक लाटांसाठी निर्बंध ठेवले तर व्यापार उद्योग करायचे कधी असा प्रश्न नाशिक शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्यावतीने आयोजित बैठकीत गुरुवारी (दि. १४) केला. लॉकडाऊनमुळे कर भरणे तसेच बँकाचे हप्ते फेडणे इतकेच नव्हे तर कामगारांचे वेतन देणे शक्य होत नसल्याने राज्य सरकारने आर्थिक पॅकेज आणि कर सवलती द्याव्यात, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शासनाकडे समस्या मांडण्यासाठी सर्व संघटना प्रतिनिधींचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स ॲंड इंडस्ट्रीजच्यावतीने निर्बंधांमुळे गुरुवारी (दि.१४) ऑनलाईन बैठक घेण्यात आली. तसेच विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.

राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याला व्यापारी आणि उद्योजकांनी समर्थन दिले आहे. मात्र त्यानंतर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. त्याच बरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ ते २२ असे दोन दिवस कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. शासन आणि प्रशासन व्यापारी आणि उद्योजकांना विश्वासात न घेता निर्णय घेत असून त्यामुळेच या घटकांना येत असलेल्या अडचणींबाबत शासनाकडे दाद मागण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

भाजप महाउद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हे समर्थनीय नसल्याचे सांगितले. आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दोन दिवसात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केल्याची माहिती दिली. तसेच सर्वांनुमते जो निर्णय होईल त्यास पाठिंबा असेल असे सांगितले.

या बैठकीस सुरेश चावला, कैलास चावला, प्रफुल संचेती, एकनाथ अमृतकर, सुमित पटवा, गिरीश नवसे, हसमुख पटेल, मिलिंद कुलकर्णी, ललिता पाटोळे, राजेंद्र फड, मिलिंद जहागीरदार, रसिक बोथरा, प्रफुल्ल जैन, मनीष रावळ, भवन साखला, महेंद्र पटेल, शरद मिश्रा, संतोषकुमार लोढा, मुस्तानगीर मोगरावाला या व्यापारी प्रतिनिधींनी यावेळी अडचणी मांडल्या.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा यांनी आभार मानले.

कोट...

निर्बंधामुळे व्यापार बंद आहे.कर्जाचे हप्ते, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे याबाबत व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे.

- दिग्विजय कापडिया, व्यापारी

कोट...

सरकार दररोज नवनवीन पत्रके काढत आहे. त्यामुळे गोंधळ होत आहे. त्यातच शासन आणि प्रशासनात कोणताही समन्वय नाही. नाशिकमध्ये केवळ व्यापारावर एक लाख कुटुंब अवलंबून आहेत, त्याची अडचण होत आहे.

- हेमंत राठी, उद्योजक

कोट...

मार्चपासून आत्तापर्यंत केवळ २० टक्के माल विकला गेला आहे. उद्याेग आणि व्यापार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कुठले तरी एक सुरू ठेवणे अयोग्य वाटते, मुंबईत दुकानांना परवानगी आहे, मग नाशिकला का नाही?

- खुशालभाई पोद्दार, व्यापारी

Web Title: Task Force to solve the problems of commercial entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.