तारुखेडले गावातील वाढत्या विजेच्या समस्या व ट्रान्सफॉर्मर व विद्युत तारेवर वाढता विजेचा दाब लक्षात घेता या विजेचे विभाजन होऊन सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी अजून एक फिडर बसविणे आवश्यक होते. त्यासाठी महावितरणकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता; परंतु त्याला तांत्रिक मंजुरी व निधीची आवश्यकता होती त्यासाठी काम लवकर सुरू होण्याबाबत तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी ऊर्जा राज्यमंत्री, प्राजक्त तनपुरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. गवळी यांनी सतत पाठपुरावा करण्यात आला होता. सध्या ११ (केव्ही ) तारुखेडले व ११ (केव्ही) करंजी येथे दोन फिडर आहेत; परंतु विजेची मागणी लक्षात घेता या फिडरची क्षमता कमी पडत होती म्हणून या दोन फिडर बरोबर एक नवीन फिडर बसविणे अत्यंत आवश्यक होते. सध्याच्या परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यानंतर खरीप हंगाम सुरू होतो, त्यामुळे ११ (केव्ही) फिडरच्या क्षमतेच्या बाहेर वीजपुरवठ्याची मागणी वाढते व त्यामुळे विद्युत यंत्रणेवर जास्तीचा भार येतो व सतत वीज पुरवठा खंडित होतो. तसेच विद्युत तारेवर लोड येऊन विद्युत तारी तुटून खाली पडतात व त्यामुळे वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता होती. शेतकरी ९९ टक्के शेतीवर अवलंबून आहे. नवीन फिडर जोडल्या गेल्यास तिन्ही (११ केव्ही) फिडरवरती समान लोड देता येईल व ही समस्या कायमची सुटेल. नवीन फिडर बसविल्यास तारुखेडले गावाची विजेची समस्या कायमची सुटणार आहे. तसेच काम सुरू झाले आहे.
तारुखेडले फिडर कामाला अखेर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST