नायगव्हाण ग्रामपंचायतीच्याउपसरपंचपदी ताराबाई सदगीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 18:34 IST2021-01-19T18:33:16+5:302021-01-19T18:34:37+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड.

येवला तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तारा सदगीर यांच्या निवड प्रसंगी सत्कार करताना संजय व्यवहारे समवेत काळू मोरे, हिराबाई बारहाते, मेघा देवकर, मंगला शिंदे आदी.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड करण्यासाठी सरपंच हिराबाई ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने ताराबाई सदगीर यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. प्रशांत पानपाटील यांनी सूचक म्हणून तर मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी अनुमोदन दिले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय व्यवहारे यांनी काम बघितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य काळू मोरे, हिराबाई बारहाते, मेघा देवकर, मंगला शिंदे आदींसह भाऊसाहेब गाढे, सुनील शिंदे, सचिन भोसले, बाळासाहेब कुलकर्णी, कृष्णा सदगीर, सुभाष पानपाटील, भाऊसाहेब ढोणे, माळी ग्रामसेवक, केदारे सह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.