उपसभापतिपदी त्र्यंबकच्या सारस्ते येथील ताराबाई माळेकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:50 IST2021-02-12T22:06:11+5:302021-02-13T00:50:14+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सारस्ते येथील ताराबाई शंकर माळेकर यांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उपसभापतिपदी त्र्यंबकच्या सारस्ते येथील ताराबाई माळेकर !
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सारस्ते येथील ताराबाई शंकर माळेकर यांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसभापती रवींद्र भोये यांचे सदस्यत्व जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी रद्दबातल ठरविल्याने रिक्त झालेल्या जागी माळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेषतः गत दहा वर्षांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे वर्चस्व दिसून येत आहे. तालुक्यातील संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, ताराबाई माळेकर व रवींद्र भोये हे पाच संचालक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहेत. संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, रवींद्र भोये व आता ताराबाई माळेकर यांच्या रुपाने एकदा सभापतिपद व तिघांना उपसभापतिपद मिळाले आहे. आता फक्त प्रभाकर मुळाणे पदापासून वंचित आहेत. दरम्यान, नूतन उपसभापती ताराबाई माळेकर यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, समाधान बोडके, मावळते उपसभापती रवींद्र भोये, विनायक माळेकर, मोतीराम दिवे, मिथुन राऊत, हिरामण गावित, नितीन देवरगावकर, राहुल शार्दुल, विठ्ठल आहेर, योगेश आहेर उपस्थित होते.